सावधान! बॅंकांमधील गैरव्यवहार वाढताय... 

सावधान! बॅंकांमधील गैरव्यवहार वाढताय... 

नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षात (2018-19) देशातील बॅंकांमधील गैरव्यवहारांचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात यासंदर्भातील आकडेवारी दिली आहे. नुसती गैरव्यवहारांची संख्याच वाढली नसून त्या गैरव्यवहारातील रकमेतसुद्धा 73.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात बॅंकिंग क्षेत्राने एकूण 71,542.93 कोटी रुपयांचे 6,801 गैरव्यवहार नोंदवले आहेत. 2017-18 या आर्थिक वर्षात हेच प्रमाण 5,916 प्रकरणांद्वारे 41,167.04 कोटी रुपयांचे गैरव्यवहार असे होते. त्यातही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील गैरव्यवहारांचा यात मोठा वाटा आहे. त्यानंतर खासगी क्षेत्रातील बॅंका आणि परकी बॅंकांचा क्रमांक लागतो. चालू आर्थिक वर्षात आतापर्यत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी एकूण 64,509.43 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांच्या 3,766 प्रकरणांची नोंद केली आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार प्रत्यक्ष गैरव्यवहाराची तारीख आणि बॅंकांना हा गैरव्यवहार लक्षात येणे यात सरासरी 22 महिन्यांचा अंतराल आहे. तर 2018-19 या वर्षात मोठ्या गैरव्यवहारांच्या बाबतीत म्हणजे 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमांच्या बाबतीत (याच प्रकारच्या गैरव्यवहारांचे मूल्य 52,200 कोटी रुपये आहे) बॅंकांना गैरव्यवहार घडल्याचे लक्षात येण्याचा कालावधी तब्बल 55 महिने इतका आहे.

वेगवेगळे कार्ड, इंटरनेट आणि डिपॉझिटच्या संदर्भात घडणाऱ्या गैरव्यवहारांचे मूल्य एकूण गैरव्यवहारांच्या तुलनेत फक्त 0.3 टक्के इतकेच होते. गैरव्यवहाराची छोटी प्रकरणे ज्या त 1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम आहे यांचे प्रमाण 2018-19 मध्ये फक्त 0.1 टक्के इतकेच होते. वेगवेगळ्या यंत्रणांची आणि त्यातील माहितीची जोडणी करून गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवत पावले उचलण्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंक अनेक विभागांशी चर्चा करणार आहे.

काय काळजी घ्याल?
-आपले पासवर्ड कोणत्याही व्यक्तीला सांगू नका. 
-फोनवर कोणत्याही बँकेकडून पासवर्ड विचारले जात नाहीत. 
-कोणत्याही भूलथापांना बळी पडून बँकेतील खात्याची माहिती देऊ नका
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com