बॅंकेची काम लवकर आटपा! मार्चमध्ये बॅंकांना असेल 'इतके' दिवस सुट्टी

मार्चमध्ये बॅंकांना बऱ्याच सुट्ट्या मिळणार आहेत
bank closed
bank closed

Bank Holidays in March 2022: डिजिटल सुविधांमुळे बॅंकाची काम आता घरबसल्या होतात. पण चेक क्लियरन्स आणि केवायसी सारख्या कामासाठी बॅंकेत (Bank) जाणे गरजेचे असते. मार्चमध्ये बॅंकाना बऱ्याच सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये कोणत्या सुट्ट्या आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे. मार्चमध्ये एकूण ९ दिवस बॅंका बंद असतील. आरबीआयनुसार (Rbi) भारतात मार्चमध्ये २०२२ मध्ये आलेल्या सण आणि इतर विशेष प्रसंगी विविध झोनमध्ये एकूण सात दिवस बँका बंद राहतील. याशिवाय रविवारी बँकेत कोणताही व्यवहार नसतो. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद असतात. महाराष्ट्रात एकूण ९ दिवस बॅंका बंद असतील.

bank closed
डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखायचयं! 'हे' पाच पदार्थ खा

अशा आहेत सुट्ट्या

१ मार्च (मंगळवार)- या दिवशी महाशिवरात्र असल्याने मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्र तसेच भारतात अनेक ठिकाणी बॅंका बंद असतील.

६ मार्च (रविवार)- रविवारी बॅंक बंद

१२ मार्च (शनिवार)- महिन्यातला दुसरा शनिवार असल्याने बॅंका बंद

13 मार्च (रविवार)- रविवारी बॅंका बंद

१८ मार्च (शुक्रवार) - होळीमुळे सुट्टी

२० मार्च (रविवार): रविवारी बॅंक बंद

२६ मार्च (शनिवार)- चौथा शनिवार असल्याने बॅंका बदं

२७ मार्च (रविवार) - रविवार असल्याने बॅंकांना सुट्टी

bank closed
किराणा ऑनलाईन मागवत असाल, तर हे वाचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com