Bank OF India E-Auction : लिलावात मालमत्ता खरेदी करण्यात जितका फायदा तेवढी रिस्कही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

E-auction

कर्जाची परतफेड करू न शकलेल्या कर्जदारांच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा बँका नियमितपणे लिलाव करतात.

लिलावात मालमत्ता खरेदी करण्यात जितका फायदा तेवढी रिस्कही

sakal_logo
By
शिल्पा गुजर

बँक ऑफ इंडिया (Bank of India) 25 नोव्हेंबरला त्यांच्या कर्ज थकबाकीदारांच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ई-लिलाव करणार आहे. यापूर्वी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 1,000 हून अधिक भूखंड (Plots), निवासी घरे, व्यावसायिक जागा आणि औद्योगिक मालमत्तांचा ई-लिलाव केला होता. SBI च्या ई-लिलावाच्या एक आठवडा आधी, बँक ऑफ बडोदा (BoB) ने देखील अशा अनेक मालमत्तांचा लिलाव केला होता.

कर्जाची परतफेड करू न शकलेल्या कर्जदारांच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा बँका नियमितपणे लिलाव करतात. कर्ज थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून आणि त्यांचा लिलाव करून बँका सरफेसी कायदा, 2002 अंतर्गत त्यांची थकबाकी वसूल करतात. पण अशा कोणत्याही लिलावात भाग घेण्यापूर्वी, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेतले पाहिजेत.

हेही वाचा: Shares Market | येणारा आठवडा बाजारातील नुकसान भरुन काढणार का?

मालमत्तेचा ई-लिलाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो

तुलनेने कमी किंमत

"इ-लिलावात सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किमतीत प्रॉपर्टीज ऑफर केल्या जातात असे ANAROCK प्रॉपर्टी कन्सल्टंट्सचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले. सहसा, मालमत्तेची किंमत बाजार मूल्यापेक्षा 10-20 टक्के कमी असते. तसेच, बँका लिलावाची किंमत अगदी वाजवी ठेवतात, जेणेकरून अधिकाधिक लोक सहभागी होतील. लोकांना चांगल्या डिल्स मिळू शकतात असे प्रॉप्सएएमसीचे डेटा इंटेलिजेंस ॲसेट मॅनेजमेंटचे बिझनेस हेड आनंद मूर्ती म्हणाले. अनेक वेळा असे घडते की काही लिलावात मालमत्ता विकल्या जात नाहीत. त्यामुळे पुढील लिलावात त्या मालमत्तेची किंमत आणखी कमी केली जाते. अशा काही गोष्टी तुमच्या पथ्यावर पडू शकतात.

प्रकल्प रखडण्याची भीती नाही

बांधकामाधीन प्रकल्पात (underConstruction) फ्लॅट किंवा घर खरेदी केल्यास प्रकल्पाच्या वितरणास (Delivery) वेळ लागण्याचा धोका असतो. पण ई-लिलावाच्या प्रक्रियेत हा प्रश्नच येत नाही असे अनुज पुरी म्हणतात.

हेही वाचा: ऑफिसमध्ये प्रभावी देहबोलीचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या सविस्तर

बँक ई-लिलावामध्ये काही जोखीम असते, कोणती ते पाहुयात...

मालमत्ता स्थिती खराब असू शकते

कर्ज थकबाकीदाराच्या मालमत्तेचा लिलाव करणे हा बँकेचा उद्देश आहे. जेणेकरून बँकेला त्यांची थकबाकी वसूल करता येईल. मालमत्तेला आकर्षक बनवण्याची किंवा दुरुस्तीची जबाबदारी बँकेची नाही. अशा स्थितीत मालमत्ता खराब अवस्थेत असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बोली लावण्यापूर्वी एकदा मालमत्ता कशी आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

स्वतः तपास करावा

एकदा लिलाव झाला की, त्या मालमत्तेची कोणतीही जबाबदारी बँकेची नसते. त्यामुळे या मालमत्तेशी संबंधित कोणताही आयकर, मालमत्ता कर किंवा अन्य कोणताही वाद आहे का, हे तुम्ही तुम्ही स्वतः तपासणे आवश्यक आहे.

मालमत्ता कोणी वापरत आहे का ?

बँकेकडे त्या मालमत्तेची फक्त कायदेशीर कागदपत्रे असतात. त्यामुळे मालमत्तेचा वापर त्याच्या आधीच्या मालकाद्वारे किंवा भाडेकरूद्वारे केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लिलावानंतर ही मालमत्ता रिकामी करण्याची जबाबदारीही नवीन खरेदीदारांची असते, त्याचा बँकेशी काही संबंध नसतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

loading image
go to top