आता भारतात बिटकॉईनची खरेदी-विक्री अशक्य 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

आता भारतात बँका किंवा ई-वॉलेटच्या माध्यमातून यापुढे आता कोणालाही बिटकॉईनची खरेदी अथवा विक्री करता येणार नाही.

मुंबई: आता भारतात बँका किंवा ई-वॉलेटच्या माध्यमातून यापुढे आता कोणालाही बिटकॉईनची खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्विमासिक पतधोरणा (आरबीआय) दोन दिवसीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयद्वारे नियमन करण्यात येणाऱ्या कोणत्याही बँकेला अथवा ई-वॉलेटला बिटकॉईनच्या खरेदी अथवा विक्रीचे व्यवहार करण्यात परवानगी नाही. 

आरबीआयकडून बँकां अथवा ई-वॉलेटला आता परवानगी नसल्याने व्यक्तीला आपल्या बँक खात्यातून क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) हस्तांतरित करता येणार नाही. शिवाय आता कोणतीही व्यक्ती किंवा संस्था आपल्या बचत खात्यातून पैसे क्रिप्टोकरन्सीच्या खात्यात हस्तांतरीत करू शकणार नाही. 

 बिटकॉइनला भारतात पसंती मिळत असल्याने आरबीआयच्या चिंतेत भर घातली होती. याचसाठी आरबीआयने याआधी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला होता. 

Web Title: Bank will not allow to buy bitcoins anymore