बँकांची कामे आज, उद्याच उरकून घ्या; तीन दिवस बँका राहणार बंद

Strike
Strike

नवी दिल्ली - वेतनवाढीच्या प्रश्‍नावर अपेक्षित तोडगा न निघाल्याने बॅंक कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजेच 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला बॅंका बंद राहणार आहेत. तसेच, रविवार लागून आल्याने सलग तीन दिवस सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे व्यवहार ठप्प होतील.

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर बॅंकांनी ग्राहकांना याबाबत माहित दिली असून, बॅंकिंग व्यवहार आटोपून घेण्याचे आवाहन केले आहे. याआधी 8 जानेवारीला बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या पार्श्‍वभूमीवर इंडियन बॅंक्‍स असोसिएशनसोबत 13 जानेवारीला वेतनवाढीसंबंधी बैठक झाली होती. ही बैठक निष्फळ ठरल्याने दोनदिवसीय संपाचा निर्णय घेतल्याचे बॅंक कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. 

मुख्य कामगार आयुक्तांशी काल (ता.27) संघटनांशी चर्चा झाली होती. त्यानुसार, मुख्य कामगार आयुक्तांनी इंडियन बॅंक्‍स असोसिएशनला कर्मचारी संपावर जाण्याआधी कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, बॅंक असोसिएशनने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने संप करण्याचा निर्णय "एआयबीईए'ने घेतला आहे. 

काय आहेत मागण्या? 
बॅंक कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 20 टक्के वेतनवाढ व पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी केली आहे. तर, इंडियन बॅंक्‍स असोसिएशनने 12.25 टक्के पगारवाढीस अनुकूलता दर्शविली असून, पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी फेटाळली आहे. या मागण्यांवर कर्मचारी संघटना आग्रही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com