बँकांच्या नियमात होणार मोठे बदल; आता एक जुलैपासून...

वृत्तसंस्था
Wednesday, 24 June 2020

एटीएममधून पैसे काढण्यावरील चार्ज हटविले

- पीएनबीकडून व्याजदरात कपात

- मिनिमम बॅलेन्स आता गरजेचा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे भारतात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. अनेक रोजगाराच्या संधी काही प्रमाणात कमी झाल्या. बँकांनीही आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अनेक नियमांमध्ये बदल केले. पण आता येत्या एक जुलैपासून बँकाच्या नियमात बदल होणार आहेत. यामध्ये एटीएममधून कॅश काढणे, मिनिमम बॅलेन्ससारख्या अनेक सुविधांमध्ये बदल होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना व्हायरस महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यास अर्थ मंत्रालयाने नवी नियमावली आणली आहे. 

एटीएममधून पैसे काढण्यावरील चार्ज हटविले

काही मर्यादेपेक्षा किंवा आपली बँक सोडून इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर यापूर्वी काही चार्जेस आकारले जात होते. मात्र, आता हे सर्व चार्जेस आकारले जाणार नाहीत. मात्र, ही सूट एक एप्रिलपासून 30 जूनपर्यंतच दिली जात होती. पण आता याची मुदत संपत आहे. त्यामुळे आता एक जुलैपासून रोकड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारे सूट मिळणार नाही. 

येस बँकेत गुंतवणूक करण्यास सरकारची ...

पीएनबीकडून व्याजदरात कपात

पंजाब नॅशनल बँकेने एक जुलैपासून बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. आता या बँकेत बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25 टक्के व्याज मिळणार आहे. 50 लाखांपर्यंत बॅलेन्सवर 3 टक्के तर 50 लाखांवरील बॅलेन्सवर 3.25 टक्के व्याज देण्यात येईल.

एसबीआय, कोटक महिंद्राने घेतला निर्णय

कोटक महिंद्रा आणि स्टेट बँक ऑफ इंडियानेही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

This Indian

मिनिमम बॅलेन्स आता गरजेचा

कोरोना व्हायरसमुळे मोठे आर्थिक संकट होते. त्यामुळे त्यापासून दिलासा देण्यासाठी बँकांनी मिनिमम बॅलेन्स ठेवण्याचे असलेले नियम शिथिल केले होते. मात्र, आता ही सूट संपत आहे. त्यामुळे आता एक जुलैपासून जर तुमच्या बचत खात्यात मिनिमम बॅलेन्स नसेल तर त्यावर दंड भरावा लागू शकतो.

भारत चीन वादात पडण्यास रशियाचा नकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banking Rules will change from 1st July 2020