भारत बंदमुळे तब्बल 21 हजार कोटींचे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

- बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रात बॅंकिंग सेवांवर परिणाम

पुणे : बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातील बॅंकिंग सेवांवरही झाला. जवळपास 40,000 बँक कर्मचारी (यात 10,000 अधिकाऱ्यांचाही समावेश) एकदिवसीय देशव्यापी संपावर होते. त्यामुळे 21 हजार कोटी रुपयांचे तब्बल 28 लाख चेक वटविण्यात आले नाहीत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 10 महत्त्वाच्या बँक कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला होता. या संपात रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसहीत इतर कर्मचारीसुद्धा सहभागी झाल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्या नेत्याने दिली आहे. अर्थात बंदर, विमानतळ येथील सेवा मात्र सुरळीत सुरू होत्या. नव्या कर्मचाऱ्यांची भरती, वेतनाचे प्रश्न, सुधारित पेन्शन इत्यादी मागण्या बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.

Image result for bharat bandh

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या पिढीतील खासगी बॅंका आणि काही परकी बॅंकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या सुधारित कामगार धोरण, परकी प्रत्यक्ष गुंतवणूक, निर्गुंतवणुकीकरण, कॉर्पोरेटायझेशन आणि खासगीकरण या धोरणांना विरोध करण्यासाठी दहा केंद्रीय बँक कर्मचारी संघटनांनी हा एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. या संपात देशभरातील जवळपास 25 कोटी लोक सहभागी झाल्याचा दावा या कर्मचारी संघटनांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banking Sector got Affected by Bharat Band