रिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे आता कर्ज होणार स्वस्त! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने रिटेल (किरकोळ) आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जे आता रिझर्व्ह बँकेच्या बाह्य बेंचमार्क स्वरुपात रेपो रेटशी संलग्न केली आहेत.

आजपासून हे नवीन दर लागू होतील. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर त्याचा फायदा बॅंकेच्या सर्व ग्राहकांपर्यंत त्वरित पोचावा यासाठी आता कर्जदर रेपो दराशी संलग्न करण्यात आली आहेत.

रिझर्व्ह बँकेने 04 सप्टेंबर 2019 रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँक ऑफ महाराष्ट्रने सर्व नवीन फ्लोटिंग दराची कर्जे, रिटेल (किरकोळ कर्जे विभाग) आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जाना रेपो दराशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेद्वारा रेपो दर रिटेल आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जाला लिंक करून कमी झालेल्या व्याजदराचा सरळ फायदा आता ग्राहकांपर्यंत पोचणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banks adopt repo rate as external benchmark from today