'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क

Banks to charges on P2P payments on UPI
Banks to charges on P2P payments on UPI

मुंबई: केंद्राने दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन बँकिंगला पर्याय म्हणून उपलब्ध करुन दिलेली 'यूनिफाईड इंटरफेस पेमेंट' अर्थात यूपीआय सेवादेखील महागणार आहे. यूपीआयवरुन पैशांची देवाणघेवाण करताना अर्थात पर्सन टू पर्सन(पी-टू-पी) व्यवहारांवर शुल्क भरावे लागणार आहे.

"आतापर्यंत, बँका यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारत नव्हत्या. परंतु युपीआय आणि आयएमपीएस व्यवहारांवर जुजबी शुल्क आकारण्याचा त्यांना अधिकार आहे.", असे राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप असबे म्हणाले.  

जगात सगळीकडेच अशा व्यवहारांवर शुल्क आकारले जात असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे, व्यापारी व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारले जाते तर 'पी-टू-पी' व्यवहारांदरम्यान पैसे पाठविणाऱ्याकडून हे शुल्क आकारले जाते असेही असबे यांनी सांगितले.

स्टेट बँकेने 1 जूनपासूनच शुल्काची आकारणी सुरु केली असून एचडीएफसी बँकदेखील पुढील महिन्यापासून या व्यवहारांवर शुल्क आकारणार आहे. परंतु एसबीआयने लवकरच हे शुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, एचडीएफसी बँकेकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. तसेच, भिम अॅप्लिकेशनवरुन व्यवहार केल्यास ही शुल्क आकारणी होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

एसबीआयच्या खात्यांमधून पैसे हस्तांतर केल्यास एक लाख रुपयांवर पाच रुपये आणि सेवाकर, एक ते दोन लाख रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरासाठी 15 रुपये अधिक सेवाकर आणि दोन लाख ते पाच लाखांपर्यंत पैसे हस्तांतरासाठी 25 रुपये आणि सेवाकर आकारला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com