बॅंकांची बुडीत कर्जे वाढणार

IL-and-FS
IL-and-FS

‘आयएल अँड एफएस’ची कर्जे बुडीत कर्जात वर्ग होणार 
नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने (एनसीएलएटी) ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांची कर्जे ही बुडीत कर्जात (अनुत्पादित कर्जे) वर्ग करण्यास बॅंकांना परवानगी दिली आहे. यामुळे बॅंकांच्या बुडीत कर्जांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्‍यता आहे. बुडीत कर्जे घोषित केली तरी, बॅंकांना तूर्त कर्ज वसुलीसाठी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास लवादाने मज्जाव केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहाकडे विविध बॅंकांची सुमारे ९० हजार कोटींचे कर्जे थकीत आहेत.

समूहात ३०० हून अधिक कंपन्या असून, त्यांची कर्ज थकबाकी ९० दिवसांत वसूल न झाल्याने बॅंकांना बुडीत कर्ज म्हणून घोषित करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी रिझर्व्ह बॅंकेने ‘एनसीएलएटी’कडे धाव घेतली होती. त्यावर अपिलीय लवादाचे प्रमुख न्यायाधीश एस. मुखोपाध्याय यांच्यासमोर सुनावणी झाली. ज्यात त्यांनी बॅंकांना याबाबतची परवानगी दिली आहे. 

‘आयएल अँड एफएस’च्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बॅंका हवालदिल झाल्या आहेत. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत बॅंकांनी ’आयएल अँड एफएस’चा पाठिंबा काढून घेऊ नये, असे अपिलीय लवादाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे थकीत कर्ज वसुलीसाठी बॅंकांना तूर्त दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करता येणार नाही. मात्र, ‘आयएल अँड एफएस‘ची खाती बुडीत कर्जात वर्ग झाल्याने बुडीत कर्जांचा बोजा वाढण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com