बँकांकडून दिलासा, कर्ज केले स्वस्त!

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बडोदा बँकेने आपला मुलभूत दर 0.10 टक्क्यांनी कमी करुन 9.5 टक्क्यांवर आणला आहे. ज्या कर्जदारांनी 1 एप्रिल, 2016 पुर्वी बँकेकडून कर्ज घेतले आहे, तसेच ज्यांनी अजून एमसीएलआर प्रणालीचा स्वीकार केलेला नाही अशा ग्राहकांना दरकपातीचा लाभ घेता येणार आहे, असे बँकेने कळविले आहे. बँकेचा वर्षभरासाठीचा एमसीएलआर दर 8.35 टक्के आहे.

देना बँकेच्या व्याजदरात घट 

देना बँकेने एमसीएलआर दरांमध्ये 0.05 टक्क्याची कपात केली आहे. बँकेच्या नवीन ग्राहकांना याचा फायदा मिळणार असून वाहनकर्जे, गृहकर्जे, वैयक्तिक कर्जे आणखी स्वस्त होतील. यानंतर, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी बँकेचा एमसीएलआर दर अनुक्रमे 8.35 टक्के, 8.45 टक्के आणि 8.55 टक्के होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने एप्रिल 2016 पासून व्याजदर निश्‍चितीसाठी नवी पद्धत लागू केली. त्यानंतर बॅंकांकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्‌स अर्थात "एमसीएलआर" निश्‍चित केला जाऊ लागला. एमसीएलआर नव्या कर्जदारांना लागू होत असला तरी जे कर्ज फेडत आहेत, अशा कर्जदारांनाही बेस रेट ऐवजी एमसीएलआरमध्ये कर्ज बदलून घेण्याचा पर्याय आहे. यासाठी त्यांना स्वीच करण्यासाठीचे शुल्क भरावे लागेल.

एमसीएलआर व्याजदराचा दरमहा आढावा घ्यावा लागतो. एमसीएलआर हा केवळ बॅंकांना बंधनकारक आहे. त्यामुळे बिगर बॅंक वित्त संस्थांना (एनबीएफसी) तो लागू होत नाही. याउलट बेस रेट (कर्जाचा किमान आधार दर) हा मुख्यत्वेकरून पतधोरणावर अवलंबून असतो. बेस रेट निश्‍चित करताना बॅंकांना इतर घटकांचा विचार करावा लागतो. सर्वसाधारणपणे एमसीएलआर आणि बेस रेटमध्ये किमान 0.25 टक्‍क्‍याचा फरक असतो.

Web Title: Banks get relief from debt, loans made cheap!