बर्कशायर हॅथवेची ‘पेटीएम’मध्ये हिस्साखरेदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - वॉरेन बफे यांच्या मालकीच्या ‘बर्कशायर हॅथवे’ या कंपनीने भारतातील ‘पेटीएम’ या डिजिटल पेमेंटमध्ये सर्वांत मोठ्या कंपनीत २ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘पेटीएम’ची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडने आज निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली.

कंपनीचे गुंतवणूक व्यवस्थापक टोड कॉम्ब्स यांना पेटीएमच्या संचालक मंडळावर घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले असून, बर्कशायर हॅथवेने गुंतवणुकीद्वारे नेमका किती हिस्सा खरेदी याबाबत कोणतिही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, बर्कशायर हॅथवेने पेटीएमचा ३ ते ४ टक्के हिस्सा खरेदी केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.  

Web Title: berkshire hathaway Shareholding in Paytm