प्री-अप्रूव्‍ह लोनसंदर्भातील घोटाळा: माहित असाव्‍यात अशा काही गोष्‍टी

Home Loan
Home LoanSakal

फखरी सर्जन

उत्‍साही, आकर्षित करण्‍यासोबत भुरळ घालणाऱ्या आवाजात एक एक्झिक्‍युटिव्‍ह तुम्‍हाला कॉल करून प्री-अप्रूव्‍ह लोन मिळाल्‍याचे सांगतो किंवा सांगते. थोडं थांबा आणि अशा फोन कॉलवर बोलणे टाळा. कारण कधी-कधी, असे कॉल्‍स फसवणूक करणाऱ्यांकडून देखील केले जातात, जे सुलभपणे पैसा कमावण्‍यासाठी व्‍यक्‍तींची फसवणूक करतात.

प्री-अप्रूव्‍ह लोन्‍सवरील बनावट ऑफर्सबाबत सावध राहा

बहुतांश प्री-अप्रूव्‍ह गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज (Pre-approved home loan or personal Loan) फसवणूकींची सुरूवात स्‍वत:ला कर्जदाता म्‍हणणाऱ्या व्‍यक्‍तीकडून आलेल्‍या फोन कॉलपासूनच होते. तो तुम्‍हाला कर्जावर उत्तम इन्‍सेटिव्‍ह्ज व व्‍याजदर मिळण्‍याची हमी देतो. ते तुमचे कर्ज मान्‍य होण्‍यासाठी अनेक वचनं व दावे करतात. हेच कर्जासंदर्भात घोटाळा सुरू होण्‍याचे पहिले चिन्‍ह आहे. कोणीही 100 टक्‍के कर्ज मंजूर होण्‍याची हमी देऊ शकत नाही. कर्ज मंजूर होण्‍याच्‍या हमीसाठी कर्जासाठी अर्ज करण्‍यापासून कर्ज मंजूर होण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये अनेक बाबी असतात.

दिवसेंदिवस ऑनलाइन कर्ज मिळण्‍यासंदर्भातील घोटाळ्यांमध्‍ये वाढ होत असताना काही मुद्दे आहेत, जे या घोटाळ्यांना आळा घालण्‍यासाठी लाल झेंड्याप्रमाणे कार्य करतात आणि तुम्‍हाला कर्जासंदर्भातील घोटाळा किंवा फसवणूक ओळखण्‍यामध्‍ये मदत करतात. सविस्‍तर माहिती मिळवण्‍याचा प्रयत्‍न करा आणि कष्‍टाने कमावलेला पैसा वाचवण्‍यासाठी फसवणूक होणे टाळा. खाली काही बाबी दिल्‍या आहेत, ज्‍याकडे बारकाईने विचार करा. (Beware of fraudsters offering fraudulent bank loan)

Home Loan
ATM मधून पैसे काढणं महागणार; जाणून घ्या डिटेल्स

१. क्रेडिट हिस्‍ट्री:

कर्ज देणारी कोणतीही प्रामाणिक आर्थिक संस्‍था किंवा कर्जदाता तुमच्‍या पार्श्‍वभूमीसोबत क्रेडिट हिस्‍ट्रीची तपासणी करेल. यामधून त्‍यांना विश्‍वास मिळेल की, तुम्‍ही जबाबदार कर्जदार बनाल आणि वेळेवर परतफेड कराल. क्रेडिट हिस्‍ट्री म्‍हणजे कर्जदार म्‍हणून तुमची कामगिरी आणि यामधून तुम्‍ही मागील कर्जांदरम्‍यान परतफेड करण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरले आहात का, हे देखील समजते. म्‍हणूनच कर्जदाता तुमची क्रेडिट हिस्‍ट्री नक्‍की पाहतो, त्‍याकडे दुर्लक्ष करत नाही. फक्‍त वैयक्तिक कर्जाच्‍या घोटाळ्यामध्‍ये कर्जदाता तुमचा क्रेडिट स्‍कोअर चांगला नसताना देखील कर्ज देण्‍यास उत्‍सुक असतो, कारण यामध्‍ये परतफेड करण्‍याचा कालावधी वाढतो आणि ते दंड देखील आकारू शकतात.

२. लोन अप्रूव्‍हल लेटर:

तुमच्‍या प्री-अप्रूव्‍ह कर्जासंदर्भात बँक किंवा आर्थिक संस्‍थेकडून कर्ज मंजूर झाल्‍याबाबतचे पत्र हा तुम्‍हाला ऑफर करण्‍यात आलेली योजना घोटाळा आहे की नाही याबाबत पुष्‍टी करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. भारतातील बहुतांश बँक लोन घोटाळे त्‍यांच्‍या मान्‍यता पत्रामधून उघडकीस येऊ शकतात. कर्जाची सत्‍यता पडताळण्‍यासाठी नेहमी खालील बाबींची तपासणी करा.

● लेटरहेडवर उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या शब्‍दांमधील चूका किंवा चुकीचे ईमेल आयडी व वेबसाइट अशा बँकेच्‍या सविस्‍तर माहितीची तपासणी करा. ऑनलाइन वेबसाइट अ‍ॅड्रेस क्रॉस-चेक करा आणि लेटरहेडवर उल्‍लेख केलेल्‍या वेबसाइटशी सुसंगत असल्याची खात्री करा. लक्षात घ्‍या की, असे बनावटी कर्ज आकर्षक व्‍याजदरांमध्‍ये देखील उपलब्‍ध आहेत.

● दुसरी गोष्‍ट म्‍हणजे लेटरहेडवर संदर्भ क्रमांकामध्‍ये उल्‍लेख केलेल्‍या कर्ज मंजूरीच्‍या तारखेची तपासणी करा. कर्ज मंजूर केल्‍याची तारीख संदर्भ क्रमांकामध्‍ये उल्‍लेख केलेल्‍या आर्थिक वर्षामधील असली पाहिजे. फसवणूक असल्‍यास तसा उल्‍लेख नसतो.

● स्‍टॅम्‍प आणि तुमचे कर्ज मंजूर करणा-या व्‍यक्‍तीची स्‍वाक्षरी त्‍याच प्राधिकरणातील व्‍यक्‍तीची असावी आणि स्‍टॅम्‍प स्‍पष्‍टपणे दिसणारा असावा.

३. कायदेशीर शुल्‍क:

तुमचे कर्ज मंजूर करण्‍यासाठी कायदेशीर शुल्‍कांबाबत विचारणाऱ्या व्‍यक्‍तीवर कधीच विश्‍वास ठेवू नये. बँका व आर्थिक संस्‍था तुमचे कर्ज मंजूर करण्‍यासाठी कधीच शुल्‍काबाबत विचारत नाही. तुमच्‍याकडून डील मंजूर करण्‍यास उत्‍सुक असलेला आणि आगाऊ पेमेंट करण्‍यास सांगणारा कोणताही कॉलर व्‍यक्‍ती तुम्‍हाला जाळ्यात अडकवण्‍याचा प्रयत्‍न करतो आणि अशा घटनांबाबत पोलिसांकडे तक्रार करा. बँका तुमच्‍या कर्जासाठी काही शुल्‍क आकारतात, तेव्‍हा तुमच्‍या कर्जामधून रक्‍कम वजा करतात आणि उर्वरित रक्‍कम तुमच्‍या बँक खात्‍यामध्‍ये हस्‍तांतरित करतात. म्‍हणून प्री-अप्रूव्‍ह लोनसाठी सर्वोत्तम ऑफर्स देण्‍याचा दावा करणाऱ्या अशा फसवणूक करणाऱ्या व्‍यक्‍तींपासून सावध राहा.

Home Loan
IDBI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेचे नवीन बदल १ जुलैपासून लागू

वर उल्‍लेख करण्‍यात आलेल्या बाबी या भारतामध्‍ये प्री-अप्रूव्‍ह कर्ज घोटाळ्यांसंदर्भात काही सर्वात मोठे धोके आहेत. अशा धोक्‍यांकडे बारकाईने लक्ष द्या आणि कष्‍टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवा. तुम्‍ही अशा घोटाळ्याला बळी पडला असाल तर तुमच्‍या परिसरातील सायबर-गुन्‍हा कक्ष व पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दाखल करा.

कर्जव्‍यवहारामधील कागदपत्रे व मान्‍यता प्रक्रियेची हाताळणी करताना सर्व माहितींची बारकाईने तपासणी करण्‍यासोबत त्‍याबाबत सत्‍यापन करण्‍याची खात्री घ्‍या. मान्‍यता पत्राच्‍या संदर्भात शब्‍दांमधील चुका, बँकेची योग्‍य अधिकृत वेबसाइट व ईमेल आयडीची तपासणी करा.

लक्षात ठेवा की, संदर्भ क्रमांक आणि कर्ज मंजूर झाल्‍याची तारीख चालू आर्थिक वर्षातील असली पाहिजे आणि कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्‍था कायदेशीर शुल्‍कासाठी कधीच विचारत नाही. ही मोजकी पण अत्‍यावश्‍यक माहिती आहे, जी तुम्‍हाला कर्जासंदर्भातील घोटाळा आणि प्रामाणिक कर्जदात्यामधील फरक ओळखण्‍यास मदत करेल.

(लेखक हे बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये चिफ ऑफ रिस्क या पदावर कार्यरत आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com