LIC चा अल्प उत्पन्न गटासाठी खास प्लॅन!

ही योजना कमी विम्याची आहे, ज्यामध्ये कोणताही GST लागू नाही.
LICs Bhagya Lakshmi Plan
LICs Bhagya Lakshmi Planesakal
Summary

ही योजना कमी विम्याची आहे, ज्यामध्ये कोणताही GST लागू नाही.

LICs Bhagya Lakshmi Plan: LIC च्या या योजनेचे नाव भाग्य लक्ष्मी योजना (Bhagya Lakshmi Plan) आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. भाग्य लक्ष्मी योजना खास अल्प उत्पन्न गटातील (Low Income Group) लोकांसाठी आणली आहे. ही योजना कमी विम्याची आहे, ज्यामध्ये कोणताही GST लागू नाही.

कोणाला ही पॉलिसी घ्यायची असेल, तर एक वैद्यकीय चाचणी करावी लागेल. या योजनेचा अर्थ 'रिटर्न प्रीमियमसह टर्म प्लॅन' देखील आहे, ज्याचा अर्थ असा आहे की प्लॅन दरम्यान भरलेल्या प्रीमियमच्या 110 टक्के रक्कम मॅच्युरिटीवेळी परत केली जाते. ही काही कालावधीची प्रीमियम योजना आहे, ज्यामध्ये पॉलिसीच्या कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो.

LICs Bhagya Lakshmi Plan
LIC च्या या योजनेत दररोज 200 रुपये वाचवा! Maturityवर कमवा 28 लाख

योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा

ही योजना घेण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 19 वर्ष आणि कमाल 55 वर्ष असावे. प्रीमियम भरण्याची मुदत (Premium Paying Term) म्हणजे ज्या वर्षांसाठी प्रीमियम भरायचा आहे ती किमान 5 वर्ष आणि कमाल 13 वर्ष असावी.

मॅच्युरिटीवेळी मिळेल फायदा

या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 20,000 रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम 50,000 रुपये आहे. प्रीमियम भरण्यासाठी 4 पर्याय आहेत. तुम्ही वर्षाला, दर सहा महिन्यांनी, दर तीन महिन्याला किंवा दर महिन्याला निवडू शकता. प्रीमियम टर्म दरम्यान भरलेल्या रकमेच्या 110 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर परत केली जाते.

LICs Bhagya Lakshmi Plan
LIC ची भन्नाट योजना; २८ लाखांसाठी गुंतवा नाममात्र रक्कम

एलआयसी भाग्य लक्ष्मी योजनेअंतर्गत (Bhagya Lakshmi Plan) ठेवीदाराला कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जर ठेवीदाराने पॉलिसी सरेंडर केली, तर त्याला जमा केलेल्या रकमेपैकी 30-90 टक्के रक्कम दिली जाईल. पॉलिसी जितकी जास्त काळ असेल तितके त्याचे सरेंडर मूल्य जास्त असेल. एखाद्या पॉलिसीधारकांनी पॉलिसी घेतल्याच्या 1 वर्षाच्या आत आत्महत्या केली तर त्याला कव्हरेजचा लाभ मिळणार नाही. त्याच बरोबर आत्महत्येची घटना 1 वर्षानंतर घडल्यास भाग्य लक्ष्मी पॉलिसी अंतर्गत कव्हरेजचा लाभ दिला जातो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com