‘बीईएल’मध्ये निर्गुंतवणूकीतून सरकारी तिजोरीत रु.1,670 कोटी जमा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या(बीईएल) निर्गुंतवणूक योजनेतून सरकारी तिजोरीत 1,670 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. संस्थात्मक तसेच किरकोळ गुंतवणूकदारांनी प्रथमच एखाद्या हिस्साविक्रीला एवढा भरभरुन प्रतिसाद दिल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

देशांतर्गत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी श्रेणीत 3.34 पट प्रतिसाद मिळाला. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे 3,081 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केली. त्यापैकी, एकट्या भारतीय आयुर्विमा मंडळाने(एलआयसी) 1,435 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. याशिवाय, किरकोळ गुंतवणूकदारांनी या हिस्साविक्रीला 3.67 पट अधिक प्रतिसाद दिला. त्यांच्यासाठी 22.33 लाख शेअर्स उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र, गुंतवणूकदारांकडून 81.87 लाख शेअर्सला मागणी आली.

केंद्र सरकारने कंपनीतील 5 टक्के हिस्सेदारीची विक्री करण्याचे योजिले होते. याअंतर्गत 'ऑफर फॉर सेलद्वारे' कंपनीच्या एक कोटी अकरा लाख शेअर्सची विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यासाठी प्रतिशेअर 1498 रुपयांची 'फ्लोअर प्राइस' निश्चित करण्यात आली होती.

Web Title: Bharat Electronics: Huge opportunity, but execution is key