‘भारत वायर रोप्स’च्या शेअरला अप्पर सर्किट

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई: भारत वायर रोप्सच्या शेअरने आज(बुधवार) 86.20 रुपयांवर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली असून, कंपनीच्या शेअरला 5 टक्के वाढीसह 'अप्पर सर्किट' लागले आहे. कंपनीला विविध क्षेत्रातून 8 कोटी रुपयांची दोन कंत्राटे मिळाली आहेत. त्यापैकी संरक्षण क्षेत्रात 6.5 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. याशिवाय, कंपनीने आणखी 60 कोटी रुपयांची कंत्राटे मिळविण्यासाठी निविदा सादर केल्या आहेत. या प्रकल्पाचे सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मूल्यमापन सुरु आहे.

मुंबई शेअर बाजारात आज(बुधवार) कंपनीचा शेअर 83.50 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 83.35 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 86.20 रुपयांवर दिवसभराची आणि 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

Web Title: Bharat Wire Rops' share upper circuit