आयडिया, बीएचईएल ‘निफ्टी 50′मधून बाहेर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी आयडिया सेल्युलर आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएचईएल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या(एनएसई) निफ्टी 50 निर्देशांकातून बाहेर पडणार आहेत. या दोन कंपन्यांऐवजी इंडियन ऑईल आणि इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सला निर्देशांकात समाविष्ट केले जाणार आहे. एनएसईची उपकंपनी इंडियन इंडेक्स सर्व्हिसेस अँड प्रोडक्टने हे बदल 31 मार्चपासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे.

मुंबई शेअर बाजारात आयडियाचा शेअर सध्या(11 वाजून 8 मिनिटे) 62.65 रुपयांवर व्यवहार करत असून 1.21 टक्क्याने वधारला आहे. दरम्यान, निफ्टी 151.55 पातळीवर व्यवहार करत असून 1.27 टक्क्याने घसरला आहे.

याशिवाय निफ्टी 500, निफ्टी 100, निफ्टी मिडकॅप 50, निफ्टी स्मॉलकॅप 250 आणि निफ्टी नेक्स्ट 50 या इतर निर्देशांकांमध्ये बदल झाले आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, पेट्रोनेट एलएनजी आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कंपन्यांना निफ्टी 100 निर्देशांकात समाविष्ट केले जाणार आहे. त्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्रायझेस, भारत फोर्ज आणि कॅस्ट्रॉल इंडिया या निर्देशांकातून बाहेर पडल्या आहेत.

निफ्टी 500 मध्ये सुमारे 25 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये दिलीप बिल्डकॉन, लार्सेन अँड टुब्रो इन्फोटेक, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, क्वेस कॉर्प, महानगर गॅस, पराग मिल्क फूड्स, थायरोकेअर, फ्युचर रिटेल या कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title: BHEL, Idea out of Nifty 50