भीम अॅपद्वारे 1 रुपया ट्रान्सफर करा आणि मिळवा 50 रुपये 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नागपूरमध्ये भीम आधार सेवेचा शुभारंभ केला होता. आता एका वर्षानंतर देखील जास्तीत जास्त लोकांना भीम (BHIM) अॅपकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने कॅशबॅकची ऑफर आणली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नागपूरमध्ये भीम आधार सेवेचा शुभारंभ केला होता. आता एका वर्षानंतर देखील जास्तीत जास्त लोकांना भीम (BHIM) अॅपकडे आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने कॅशबॅकची ऑफर आणली आहे. डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक आणि व्यापारी दोघांना अनुक्रमे 750 रुपये आणि  1 हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळणार आहे.

भीम अॅपशी नव्याने जोडणाऱ्या युजर्सला पहिल्या व्यवहारावर 50 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. मात्र पहिला व्यवहार किती रुपयांचा हवा याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ग्राहकाला अगदी एक रुपयांचा व्यवहार करून देखील त्याबदल्यात 50रुपयांची  कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे. 

 भारत शासनाचे भीम अॅप्लिकेशन हे यूपीआय-आधारित असे एक अॅप असून नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खासकरून युवकांना डिजीटल व्यवहारांकडे आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आले आहे. फक्त  दोन एमबीचे  हे अॅप ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’द्वारे चालवले जाते. 

नोटाबंदीनंतर अधिकाधिक लोकांनी रोखीचा वापर कमी करावा आणि डिजिटल पद्धतीने 'कॅशलेस' व्यवहार करावेत यासाठी मोदी सरकारने याआधी देखील ग्राहकांसाठी 'लकी ग्राहक योजना' आणि व्यापारांसाठी 'डिजिधन व्यापार योजने'ची घोषणा केली होती.

Web Title: BHIM App Now Offers Cashback Worth Up to Rs. 750 to Customers