निर्देशांकाचा ‘बाउन्स बॅक’

‘डाऊ जोन्स’ने गेल्या शुक्रवारी ५७५ अंशांची तेजी नोंदविल्याने या आठवड्याच्या सुरवातीस देखील आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय शेअर बाजारांसाठी सकारात्मक संकेत मिळू शकतात.
bhushan godble on share market bounce back nse bse nifty 50 sensex
bhushan godble on share market bounce back nse bse nifty 50 sensexsakal
Summary

‘डाऊ जोन्स’ने गेल्या शुक्रवारी ५७५ अंशांची तेजी नोंदविल्याने या आठवड्याच्या सुरवातीस देखील आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय शेअर बाजारांसाठी सकारात्मक संकेत मिळू शकतात.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५४,८८४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,३५२ अंशांवर बंद झाले. सध्या प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांनी महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरवाढीचे धोरण स्वीकारलेले दिसत आहे. भू-राजकीय समस्या, कच्च्या तेलातील भाववाढ, वाढती महागाई असे चिंतेचे वातावरण असूनदेखील जागतिक पातळीवर शेअर बाजारांनी ‘बाउन्स बॅक’ करीत सकारात्मक संकेत दिले. त्यामुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने देखील ६३२ अंशांची, तर ‘निफ्टी’ने १८२ अंशांची तेजी दर्शविली. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, निर्देशांक सध्या ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंतरची उसळी घेताना दिसत आहे. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने गेल्या शुक्रवारी ५७५ अंशांची तेजी नोंदविल्याने या आठवड्याच्या सुरवातीस देखील आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय शेअर बाजारांसाठी सकारात्मक संकेत मिळू शकतात. आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘निफ्टी’ची १५,६७१ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. फंडामेंटल्सनुसार, सध्या ‘निफ्टी’चे किंमत उत्पादन गुणोत्तर २० अंशांच्या आसपास आहे.

येत्या ६ ते ८ जून दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावाविषयक समितीची बैठक होणार आहे. मध्यवर्ती बँकांचे पतविषयक धोरण हे जरी किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराच्या पातळीला लक्ष करून ठरत असले तरी घाऊक महागाई दरातील मोठी वाढ ही किरकोळ वस्तूंच्या किमतींवर पुढे जाऊन परिणाम करत असते. यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालातून संकेत दिले आहेत. जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थिती, औद्योगिक कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च यांमुळे वस्तू व सेवांच्या किमतींवर परिणाम होत आहे.

ज्या कंपन्यांकडे कच्च्या मालाच्या किमतींमध्ये होत असलेली भाववाढ अंतिम ग्राहकांपर्यंत पोचविण्याची शक्यता आणि क्षमता आहे, ज्या कंपन्यांवर कर्जाचे प्रमाण कमी आहे, ज्या कंपन्या गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवून दीर्घावधीमध्ये व्यवसायवृद्धी करू शकतात, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी संयम ठेऊन गुंतवणुकीचे धोरण स्वीकारणे हिताचे ठरू शकेल.

पीआय इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव रु. २६७५)

१९४६ मध्ये स्थापित झालेली पीआय इंडस्ट्रीज लि. ही कृषी-रसायन क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. कंपनीकडे रसायनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे. कंपनीची उत्पादने जगभरातील शेतात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. कंपनीच्या उदयपूर येथील संशोधन आणि विकास केंद्रात ३०० हून अधिक शास्त्रज्ञांची एक समर्पित टीम आहे. ९ विभागीय कार्यालये, २८ डेपो, १५०० अनुभवी फील्ड फोर्स, दहा हजार सक्रिय डीलर-वितरक आणि देशभरात पसरलेल्या एक लाखापेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांसह कंपनी एक विस्तृत वितरण नेटवर्क चालवते. कंपनीचे वितरण नेटवर्क भारतातील १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचले आहे. पीआय इंडस्ट्रीज या कंपनीने सध्याच्या अस्थिर वातावरणात देखील जाहीर झालेल्या निकालांनुसार वार्षिक तत्वावर विक्रीत सुमारे १७ टक्के, तसेच नफ्यामध्ये १४ टक्के वाढ नोंदविली आहे. अविक्राच्या (गहू तणनाशक) चांगल्या कामगिरीसह कंपनीने विक्री; तसेच नफ्यात वाढ दर्शविली आहे. सध्या उत्पादने किंवा सेवा तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ (इनपुट कॉस्ट), पुरवठा साखळीतील व्यत्यय, रशिया-युक्रेन युद्ध अशी आव्हाने असूनदेखील या कंपनीने खर्चाचे विचारपूर्वक व्यवस्थापन केले आहे. नव्या विश्लेषणात्मक साधनांच्या मदतीने १० पेक्षा जास्त ठिकाणी प्रक्रिया देखरेख लागू केल्याने कंपनीच्या निव्वळ विक्री निश्चित मालमत्तेचे प्रमाण १.८९ वरून २.०६ वर सुधारणा दर्शवत आहे. कंपनीच्या ग्राहकसंख्येत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढ ही कंपनी अंतिम ग्राहकांपर्यंत पोचवू शकते. कंपनी व्यवस्थापनाला आर्थिक वर्ष २३ मध्ये १८ ते २० टक्के महसूलवाढीची अपेक्षा आहे. ही कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे. शिवाय व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करीत आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, दीर्घावधीच्यादृष्टीने पीआय इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com