‘पीएनबी’ला सर्वाधिक तोटा

पीटीआय
बुधवार, 16 मे 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १३ हजार ४१६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बॅंकेचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक तोटा ठरला आहे. 

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १३ हजार ४१६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बॅंकेचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक तोटा ठरला आहे. 

बॅंकेने बुडीत कर्जांसाठी केलेल्या तरतुदीमुळे तोटा वाढला आहे. बॅंकेला आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २६१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत बॅंकेचे उत्पन्न कमी होऊन १२ हजार ९४५ कोटी रुपयांवर आले आहे. त्याआधीच्या वर्षातील याच काळात ते १४ हजार ९८९ कोटी रुपये होते. बॅंकेच्या बुडीत कर्जांमध्ये वाढ होऊन मार्चअखेर ते १८.३८ टक्‍क्‍यांवर पोचली आहेत. गेल्या वर्षी मार्चअखेर हे प्रमाण १२.५३ टक्के होते. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्या गैरव्यवहारामुळे बॅंकेच्या तोट्यात वाढ झाली आहे. 

तिमाही तोटा  - १3,४१६ कोटी रुपये
बुडीत कर्ज - १८.३८ टक्के

Web Title: biggest loss to PNB