'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक: बिल गेट्स

 'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक: बिल गेट्स

वॉशिंग्टन: आयुष्यात प्रत्येकाकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात चुका होत असतात. पण जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याकडूनही अशीच मोठी चूक झाली आहे असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. जगभर ज्यांच्या मायक्रोसॉफ्ट विंडोचे गुणगान गायले जातात आणि दानशूर म्हणून ज्यांना ओळखले जाते असे बिल गेट्स यांनी देखील एका झालेल्या मोठ्या चुकीची कबुली दिली आहे. 

अँड्रॉइड विकत न घेणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अशी कबुली आता बिल गेट्स यांनी स्वतः दिली आहे. आज प्रत्येकजण अँड्रॉइडचा वापर करतो आहे. गुगलने जुलै २००५ मध्ये अँड्रॉइड तंत्रज्ञान सुमारे ३४७ कोटी रुपयांना विकत घेतले. या तंत्रज्ञानाने नेमके काय होणार आहे याची माहिती बाहेर येऊ दिली नव्हती. मायक्रोसॉफ्ट त्यावेळी विंडोज मोबाईलवर काम करत होते. विंडोज मोबाईल बाजारात आले देखील मात्र अँड्रॉइडने स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती केली होती. अँड्रॉइडमुळे विंडोज मोबाईल ग्राहकांना आकर्षून घेऊ शकला नाही. अखेर आज बिल गेट्स यांनी अँड्रॉइड विकत न घेतल्याची खंत बोलून दाखवली. 

सध्याचे मोबाईल युग असून अँड्रॉइड ज्या ठिकाणी पोचले आहे त्याठिकाणी मायक्रोसॉफ्ट पोहोचू शकत नाही. विंडोज आणि ऑफिस तंत्रज्ञानाच्या आधारे मायक्रोसॉफ्टने अव्वल क्रमांक गाठला. मात्र अँड्रॉइडच्या बाबतीत दूरदर्शीपणा कमी पडला.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com