‘पतंजलि’च्या बाळकृष्णांना 'अच्छे दिन'; कोट्यधीशांच्या यादीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

चीनच्या हुरन या संस्थेच्या अहवालानुसार, भारतातील टॉप टेन श्रीमंतांच्या बाळकृष्णन यांचा समावेश करण्यात आला आहे. ते या आधी 25 व्या स्थानावर होते. ते भारतातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत 8 व्या स्थानावर पोचले आहेत. त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. 

मुंबई: श्रीमंत भारतीयांच्या यादीत आता योगगुरु रामदेव बाबा यांचे सहकारी, ‘पतंजलि’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या नावाची देखील भर पडली आहे. त्यानंतर नुकताच बाजारात आयपीओ आणलेले डी-मार्टचे राधाकिशन दमानी यांनी देखील टॉप 10 मध्ये बाजी मारली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पहिले स्थान कायम राखले आहे. 

चीनच्या हुरन या संस्थेच्या अहवालानुसार, भारतातील टॉप टेन श्रीमंतांच्या बाळकृष्णन यांचा समावेश करण्यात आला आहे. ते या आधी 25 व्या स्थानावर होते. ते भारतातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत 8 व्या स्थानावर पोचले आहेत. त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले बाळकृष्ण यांच्या 'पतंजलि'ची उलाढाल देखील 10 हजार 561 कोटींवर पोचली आहे. तसेच डी-मार्टचे राधाकिशन दमानी यांना देखील डी-मार्टच्या शेअर बाजारातील प्रवेशाने मालामाल केले आहे. तर रिलायन्स .'जिओ'मुळे मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर टिकून राहण्यास यशस्वी झाले आहेत. अंबानी यांची संपत्ती 58 टक्क्यांनी वधारून 2570 अब्जांवर पोचली आहे. अंबानी यांची संपत्ती येमेन या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीपेक्षा 50 टक्के अधिक आहे.

Web Title: Billionaire Baba: What makes Acharya Balkrishna one of India's richest