काळा पैसा शोधण्यासाठी नवी प्रणाली

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

सीबीआयला तपासात होणार मदत; माहितीची पडताळणी सोपी 

नवी दिल्ली: काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नव्या ऑनलाईन प्रणालीची मदत होणार आहे. या प्रणालीमुळे माहिती जमा करणे आणि बॅंका, प्राप्तिकर विभाग आणि आर्थिक गुप्तचर पथकासह अन्य यंत्रणांकडून या माहितीची पडताळणी करता येणार आहे.

याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाने आंतरविभागीय समिती नेमली होती. या समितीने सध्याच्या यंत्रणेत बदल करण्याची सूचना केली होती. सध्याची बेहिशेबी मालमत्तेची मोजदाद करण्याची व्यवस्था काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्यावेळी माहिती मिळण्याचे प्रमाण कमी होते आणि व्यक्तिगतरीत्या भेट देऊन माहिती गोळा करावी लागत होती. त्यामुळे संगणकाच्या सहाय्याने नवी प्रणाली विकसित करण्याची शिफारस समितीने केली होती.

याला मनुष्यबळ मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. समितीच्या अहवाल अधिकृरीत्या स्वीकारण्याआधी सीबीआय यावर म्हणणे मांडणार आहे. सीबीआयने गेल्या वर्षी भ्रष्टाचाराच्या 673 प्रकरणांमध्ये 1 हजार 300 सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली.

शास्त्रीय पद्धतीला महत्व 

नव्या प्रणालीत बेहिशेबी मालमत्ता, उत्पन्न आणि त्याच काळातील खर्च यांची ऑनलाइन तपासणी करता येणार आहे. नव्या प्रणालीमध्ये शास्त्रीय पद्धतीला महत्व देण्यात येणार असून, सर्व छुपी माहिती आधुनिक साधनांचा वापर करून बाहेर काढण्यात येणार आहे.

(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा sakalmoney.com )

Web Title: black money holder search now new technique