तुमचे काळे धन लपून राहिलेले नाही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सरकारपासून तुमचे काळे धन लपून राहिलेले नाही, अशा आशयाच्या जाहिराती प्राप्तिकर विभागाने देशभरातील वृत्तपत्रांमध्ये दिल्या आहे. बेहिशेबी उत्पन्न जाहीर करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहनही यातून करण्यात आले आहे.

देशभरातील वृत्तपत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाने जाहिरातील प्रसिद्ध केल्या आहेत. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच, तुमचे बेहिशेबी उत्पन्न सरकारपासून लपून राहिलेले नाही, असा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत तुमचे बेहिशेबी उत्पन्न जाहीर करा आणि देशातील वंचितांच्या सामाजिक- आर्थिक विकासाला गती द्या, असे आवाहनही प्राप्तिकर विभागाने केले आहे.

बेहिशेबी उत्पन्न जाहीर न केल्यास तुम्हाला कर व अधिभार भरण्यासोबत 77.25 उपकर आणि दंड व शिक्षाही होऊ शकते. यामुळे या योजनेत बेहिशेबी उत्पन्न जाहीर करून कारवाई टाळा. तुमची माहिती गोपनीय राहणार असून, ही योजना 31 मार्चपर्यंत खुली असेल, असे प्राप्तिकर विभागाने जाहिरातीत म्हटले आहे

Web Title: black money is not hidden