नोटा रद्दचा निर्णय धाडसी मात्र पुरेसा नाही

पीटीआय
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार घेतलेला निर्णय धाडसी आहे. मात्र, भ्रष्टाचाराविरोधात त्यांचे हे पाऊल पुरेसे नाही, असे मत चिनी माध्यमांनी व्यक्त केले आहे. याचसोबत मोदींनी याबाबत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा सल्ला घेण्याचेही सांगण्यात आले आहे. 

भारतामध्ये मोदींनी एक हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय धाडसी असल्याचे म्हटले आहे. मोदींचा हा निर्णय अनेकांना आश्‍चर्याचा धक्का देणारा आहे. या निर्णयाचा काळ्या पैशांवर नक्कीच परिणाम झाला आहे. भारतातील वास्तवाला अनुसरूनचा हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात बेकायदेशीर व्यवहारांमध्ये या नोटा वापरात येत होत्या. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या नोटांचा व्यवहार जवळपास ८० टक्के असल्याने भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढण्यास मदत होणार असल्याचे चिनी माध्यमांचे म्हणणे आहे. 

चिनी माध्यमांनी मोदींच्या निर्णयाची प्रशंसा करताना काळ्या पैशांविरोधात आणखी कठोर पावले उचलण्याचे सुचविले आहे. चिनी माध्यमांपूर्वी पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले होते.

चीनमध्ये २०१२ मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सरकार व सेन्यदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाला अनेक घटकांनी विरोध केला होता. मात्र, जिनपिंग यांनी हा विरोध मोडून काढत कार्यवाही केली होती.

Web Title: Brave enough, but not cancel the decision currency