ब्रेक्‍झिटची तयारी 29 मार्चपासून सुरू

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

ब्रुसेल्स: ब्रिटनने युरोपीय महासंघापासून वेगळे होण्याची प्रक्रिया 29 मार्चपासून सुरू करणार असल्याचे सूतोवाच केले. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या प्रवक्‍त्यांनी ही माहिती दिली.

ब्रुसेल्स: ब्रिटनने युरोपीय महासंघापासून वेगळे होण्याची प्रक्रिया 29 मार्चपासून सुरू करणार असल्याचे सूतोवाच केले. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या प्रवक्‍त्यांनी ही माहिती दिली.

यासंबंधी मे या 27 सदस्य देशांना पत्र लिहून याबाबत घोषणा करणार आहे. त्यानंतर ब्रिटनकडे दोन वर्षे चर्चेचा कालावधी असणार आहे. या कालावधीत ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या अटींवर चर्चा करू शकेल. हे सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पडले तर मार्च 2019 पर्यंत ब्रेक्‍झिटची प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता आहे. 27 देश अटी व नियमांवर ब्रिटनच्या पंतप्रधानांना 48 तासांमध्ये प्रतिसाद देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक्‍झिटच्या घोषणेनंतर 27 देशांच्या युरोपीय महासंघाकडे चर्चा आणि विनिमय करण्यासाठी पुरेसा कालावधी हवा आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. युरोपीय महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ड डस्क हे युरोपीय महासंघाच्या ब्रेक्‍झिटच्या बैठकीकरता जबाबदार व्यक्ती असणार आहेत. ब्रिटनच्या ब्रेक्‍झिटच्या घोषणेनंतर 48 तासांच्या आत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करणे बंधनकारक असणार आहे.

Web Title: brexit preparation start now 29 march