'ब्रिटानिया इंडस्ट्रीज'चा निफ्टी 50 निर्देशांकात समावेश होणार 

'ब्रिटानिया इंडस्ट्रीज'चा निफ्टी 50 निर्देशांकात समावेश होणार 

मुंबई: एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा निफ्टी 50 निर्देशांकात समावेश होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (एचपीसीएल) जागी ब्रिटानियाचा समावेश करण्यात येणार आहे.  एनएसईच्या समितीने हे बदल 29 मार्चपासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे. एचपीसीएल निफ्टी 50 निर्देशांकातून बाहेर पडणार असल्याच्या बातमीने सकाळच्या सत्रात एचपीसीएलचा शेअर 1.54 टक्क्यांच्या घसरणीसह 227.40 रुपयांवर व्यवहार करत होता. 

राष्ट्रीय शेअर बाजारात एचपीसीएलचा शेअर सध्या (12 वाजून 40 मिनिटे) 62.65 रुपयांवर व्यवहार करत असून 1.15 टक्क्याने म्हणजेच 3.10 रुपयांनी वधारला आहे. तो 272.25 रुपयांवर व्यवहार करतो आहे. तर ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा शेअर 3100 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट, डिव्हीज लॅब, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, पेज इंडस्ट्रीज आणि युनायटेड ब्रेवरीज या सहा कंपन्यांचा निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकात समावेश करण्यात येणार आहे, असे एनएसईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निफ्टी 500, निफ्टी 100, निफ्टी मिडकॅप 150, निफ्टी स्मॉलकॅप 250, निफ्टी मिडकॅप 50 आणि निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी 200 मध्ये ही त्याचप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com