बीएसईचा बहुप्रतिक्षित आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई: मुंबई शेअर बाजाराची (बीएसई) बहुप्रतिक्षित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) योजना आजपासून खरेदीसाठी खुली होत आहे सुरू होत आहे. गुंतवणूकदारांना 25 जानेवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.

मुंबई: मुंबई शेअर बाजाराची (बीएसई) बहुप्रतिक्षित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) योजना आजपासून खरेदीसाठी खुली होत आहे सुरू होत आहे. गुंतवणूकदारांना 25 जानेवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.

बीएसईने प्रतिशेअर 805 ते 806 रुपयांचा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आयपीओसाठी अर्ज करताना गुंतवणूकदारांना किमान 18 शेअर्स खरेदी करणे बंधनकारक आहे. याशिवाय अधिक शेअर्स खरेदीसाठी अर्ज करावयाचा असल्यास 18 च्या पटीत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. सिंगापूर एक्सचेंज आणि सिटीग्रुपसह एकुण 300 विद्यमान भागधारकांच्या 15.4 दशलक्ष शेअर्सची विक्री केली जाणार आहे. बीएसईकडून या योजनेतून सुमारे 1350 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे, अशी माहिती बाजाराच्या डीआरएचपीमध्ये देण्यात आली होती.

बीएसईच्या शेअरची 3 फेब्रुवारीरोजी प्रतिस्पर्धी स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) नोंदणी करण्यात येणार आहे. बीएसई शेअरची नोंदणी करणारे देशातील पहिले स्टॉक एक्सचेंज आहे. एनएसई देखील लवकरच आयपीओच्या माध्यमातून सुमारे दहा हजार कोटींचा निधी उभारणार आहे.

Web Title: BSE IPO now open