मुंबई शेअर बाजाराची भांडवल उभारणी

share market
share market

मुंबई: बहुप्रतिक्षित मुंबई शेअर बाजाराची (बीएसई) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) उद्यापासून (सोमवार) सुरू होणार आहे. बीएसईचा आयपीओ 23 जानेवारीपासून खरेदीसाठी खुला होणार असून 25 जानेवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.

बीएसईने प्रतिशेअर 805 ते 806 रुपयांचा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आयपीओसाठी अर्ज करताना गुंतवणूकदारांना किमान 18 शेअर्स खरेदी करणे बंधनकारक आहे. याशिवाय अधिक शेअर्स खरेदीसाठी अर्ज करावयाचा असल्यास 18 च्या पटीत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत. सिंगापूर एक्सचेंज आणि सिटीग्रुपसह एकुण 300 विद्यमान भागधारकांच्या 15.4 दशलक्ष शेअर्सची विक्री केली जाणार आहे. बीएसईकडून या योजनेतून सुमारे 1350 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे, अशी माहिती बाजाराच्या डीआरएचपीमध्ये देण्यात आली होती.

बीएसईच्या शेअरची 3 फेब्रुवारीरोजी प्रतिस्पर्धी स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) नोंदणी करण्यात येणार आहे. बीएसई शेअरची नोंदणी करणारे देशातील पहिले स्टॉक एक्सचेंज आहे. एनएसई देखील लवकरच आयपीओच्या माध्यमातून सुमारे दहा हजार कोटींचा निधी उभारणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com