सेन्सेक्‍समधील घसरणीला 'ब्रेक' 

पीटीआय
गुरुवार, 20 एप्रिल 2017

भारतीय हवामान खात्याने यंदा मॉन्सून सरासरीएवढा असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळी सुरवातीपासूनच वाढ होण्यास सुरवात झाली.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये मागील चार सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर बुधवारी पाचव्या सत्रात थांबली.

सेन्सेक्‍स 17 अंशांनी वधारून 29 हजार 336 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी किरकोळ एक अंशानी घसरून 9 हजार 103 अंशावर बंद झाला. 

भारतीय हवामान खात्याने यंदा मॉन्सून सरासरीएवढा असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळी सुरवातीपासूनच वाढ होण्यास सुरवात झाली. तो 29 हजार 388 या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या नफेखोरीमुळे निर्देशांकात घसरण सुरू झाली.

अखेर तो कालच्या तुलनेत 17 अंशांनी वधारून 29 हजार 336 अंशांवर बंद झाला. मागील सलग चार सत्रांत निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली होती. आज पाचव्या सत्रात निर्देशांकातील घसरण अखेर थांबून तो सावरला.

Web Title: BSE NSE sensex investment Indian economy