सेन्सेक्‍समधील वाढ सुरूच 

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आज ग्रासिम, बॅंक ऑफ बडोदा, इंडियाबुल्स, झी, अदानी पोर्टस, गेल, एचडीएफसी, एशियन पेंट्‌स आणि मारुती सुझुकी यांच्या समभागांत सर्वाधिक वाढ झाली.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स गुरुवारी 86 अंशांनी वाढून 29 हजार 422 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टी 32 अंशांची वाढ होऊन तो 9 हजार 136 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये मागील पाच सत्रांमध्ये होणाऱ्या घसरणीला आज अखेर विराम मिळाला. 

जागतिक पातळीवरील सकारात्मक आर्थिक परिस्थितीमुळे शेअर बाजारात आज उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्‍सची सकाळी सुरवात चांगली झाली. आज सेन्सेक्‍समध्ये 29 हजार 453 अंश ते 29 हजार 341 अंश या दरम्यान चढउतार झाले. अखेर तो कालच्या तुलनेत 86 अंशांनी वाढून 29 हजार 422 अंशांवर बंद झाला.

आज ग्रासिम, बॅंक ऑफ बडोदा, इंडियाबुल्स, झी, अदानी पोर्टस, गेल, एचडीएफसी, एशियन पेंट्‌स आणि मारुती सुझुकी यांच्या समभागांत सर्वाधिक वाढ झाली. येस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, इंडियन ऑइल, टाटा पॉवर, सन फार्मा, एनटीपीसी आणि कोल इंडियाच्या समभागांमध्ये घसरण नोंदविण्यात आली. 

. . . . . . 

Web Title: BSE NSE stock exchange Indian Economy