‘बीएसई’ने अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले रु.373 कोटी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

नवी दिल्ली: मुंबई शेअर बाजाराने(बीएसई) प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) योजनेच्या दोन दिवसआधी अँकर गुंतवणूकदारांकडून 373 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. देशातील शेअर बाजाराचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांना सोमवारपासून(ता. 23) खरेदीसाठी खुला होत आहे.

नवी दिल्ली: मुंबई शेअर बाजाराने(बीएसई) प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) योजनेच्या दोन दिवसआधी अँकर गुंतवणूकदारांकडून 373 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. देशातील शेअर बाजाराचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांना सोमवारपासून(ता. 23) खरेदीसाठी खुला होत आहे.

अँकर गुंतवणूकदारांमध्ये गोल्डमन सॅक्स अॅसेट मॅनेजमेंट, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड, सिटीग्रुप, आयडीएफसी, म्युच्युअल फंड, डीएसपी ब्लॅकरॉक, कॅपिटल वर्ल्ड, रिलायन्स कॅपिटल ट्रस्टी कंपनी आणि कुवेत इन्वेस्टमेंट ऑथॉरिटी फंड, अशी माहिती कंपनीने शेअर बाजारात दिली आहे. गुंतवणूकदारांनी प्रतिशेअर 806 रुपयांप्रमाणे कंपनीच्या शेअर्सची खरेदी केली आहे.

याशिवाय, बजाज होल्डिंग्स इन्व्हेस्टमेंट, कॅल्डवेल इंडिया होल्डिंग्स, असाशिया बन्यान पार्टनर्स, सिंगापूर एक्सचेंज, जॉर्ज सोरोस यांचा क्वांटम फंडाची मॉरिशसमधील उपकंपनी आणि अटिकस या फॉरेन फंडानेदेखील आयपीओपुर्वी कंपनीत गुंतवणूक केली आहे.

बीएसईचा आयपीओ 23 ते 25 जानेवारीदरम्यान खरेदीदारांसाठी खुला राहणार आहे. यासाठी प्रतिशेअर 805 ते 806 रुपयांचा किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे. आयपीओसाठी खरेदीसाठी अर्ज करताना गुंतवणूकदारांना किमान 18 शेअर्स खरेदी करणे बंधनकारक आहे. अधिक शेअर्स खरेदी करावयाचे असल्यास 18 च्या पटीत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.

यावेळी शेअर बाजारातील प्रमुख भागधारक सिंगापूर एक्सचेंज आणि सिटीग्रुपसह एकुण 300 विद्यमान भागधारक एकुण 15.4 दशलक्ष शेअर्सची विक्री करतील. या योजनेतून शेअर बाजाराला 1200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यानंतर साधारणपणे 3 फेब्रुवारीला प्रतिस्पर्धी राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची नोंदणी होईल, अशी माहिती बीएसईने सादर केलेल्या निवेदनात देण्यात आली होती.

मागील महिन्यात राष्ट्रीय बाजारानेदेखील तब्बल एक अब्ज डॉलरच्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी भांडवली बाजार नियामक 'सेबी'कडे अर्ज सादर केला होता.

Web Title: BSE raises Rs 373 crore from anchor investors