‘बीएसई’च्या आयपीओसाठी प्रतिशेअर रु.805-806 किंमतपट्टा जाहीर

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई: मुंबई शेअर बाजाराने(बीएसई) प्राथमिक समभाग विक्रीसाठी(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) प्रतिशेअर 805 ते 806 रुपयांचा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आयपीओसाठी खरेदीसाठी अर्ज करताना गुंतवणूकदारांना किमान 18 शेअर्स खरेदी करणे बंधनकारक आहे. अधिक शेअर्स खरेदी करावयाचे असल्यास 18 च्या पटीत शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.

शेअर बाजाराची बहुप्रतिक्षित समभाग विक्री या महिन्याच्या 23 ते 25 तारखेदरम्यान पार पडणार आहे. यावेळी शेअर बाजारातील प्रमुख भागधारक सिंगापूर एक्सचेंज आणि सिटीग्रुपसह एकुण 300 विद्यमान भागधारक एकुण 15.4 दशलक्ष शेअर्सची विक्री करतील. या योजनेतून शेअर बाजाराला 1200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यानंतर साधारणपणे 3 फेब्रुवारीला प्रतिस्पर्धी राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या शेअरची नोंदणी होईल, अशी माहिती बीएसईने सादर केलेल्या निवेदनात देण्यात आली होती.

मागील महिन्यात राष्ट्रीय बाजारानेदेखील तब्बल एक अब्ज डॉलरच्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी भांडवली बाजार नियामक 'सेबी'कडे अर्ज सादर केला होता.

Web Title: BSE sets IPO price band at Rs 805-806 per share