‘बीएसएनएल’ चालू आर्थिक वर्षात करणार रु.4,300 कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी 'बीएसएनएल' चालू आर्थिक वर्षात रु.4,300 कोटी भांडवली गुंतवणूक करणार आहे. तसेच कंपनीने पुढील आथिर्क वर्षात 75,000 वाय-फाय हॉटस्पॉट बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

दूरसंचार क्षेत्रात निकोप आणि निरोगी स्पर्धा टिकून रहावी आणि ग्राहकांचे हित जपण्यासाठी या क्षेत्रात बीएसएनएलची उपस्थिती
गरजेची आहे. सध्या 5000 हॉटस्पॉट लावले असून चालू आर्थिक वर्षात 35,000 तर पुढील वर्षात 35,000 हॉटस्पॉट लावण्यात येणार आहे.'' असे दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

खाजगी क्षेत्रातील दोन कंपन्यांशी भागीदारी बीएसएनएलने 5,000 हॉटस्पॉट बसवले आहेत. आता आणखी 35,000 हॉटस्पॉट बसवण्यासाठी बीएसएनएल सहाशे कोटींचे भांडवल गुंतवणार आहे, अशी माहिती बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

Web Title: BSNL earmarks Rs 4,300-cr capex for FY18, plans 75K WiFi sites