बीएसएनएलची जमीन, मालमत्ता विक्रीला

BSNL
BSNL

मुंबई - तोटा कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएलतर्फे जमीनविक्रीसोबत व्यावसायिक मालमत्ता, फायबर केबल, टॉवर भाड्याने देण्याचे उपाय योजले जात आहेत. आगामी मे-जून महिन्यात बीएसएनएल बाँडविक्री करणार असून,  सर्व उपायांद्वारे चार वर्षांत ३० हजार कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता आहे.

त्याशिवाय ऑक्‍टोबरपर्यंत देशात त्यांची फोर-जी सेवादेखील सुरू होईल, अशी माहिती बीएसएनएलचे मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी दिली.

बीएसएनएल व एमटीएनएलचे विलीनीकरण दीड ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. बीएसएनएल बंद पडणार नसून उलट केंद्र सरकार नव्या जोमाने त्याचे पुनरुज्जीवन करणार आहे. दोघांच्या विलीनीकरणासाठी शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या एमटीएनएलची नोंदणी संपुष्टात आणणे किंवा बीएसएनएलला शेअर बाजारात नोंदणीकृत करणे, यापैकी एक बाब करावी लागेल. बीएसएनएलला शेअर बाजारात आणण्याचा प्रस्ताव केंद्राने यापूर्वी फेटाळला आहे. त्यामुळे वरिष्ठपातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचेही मुख्य महाव्यवस्थापक मनोजकुमार मिश्रा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com