‘एअरटेल’चा रिलायन्स जिओला ‘जोर का झटका’

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या बाजारातील प्रवेशानंतर भारती एअरटेलने बाजारातील पहिले स्थान गमावले आहे. जिओने अनेक नवीन उच्चांक प्रस्थापित केले. शिवाय जिओमुळे सर्वच दूरसंचार कंपन्यांना फटका बसला. मात्र रिलायन्स जीओला एअरटेलने सक्रिय वारकर्त्यांच्या (ऍक्टिव्ह युजर्स) बाबतीत पछाडले आहे, असे गोल्डमन सॅक्सच्या ताज्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.

एप्रिलमध्ये आलेल्या अहवालानुसार, भारतातील अग्रगण्य टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी रिलायन्स जिओपेक्षा ऍक्टिव्ह युजर्स जोडले आहेत. सरलेल्या वर्षात सप्टेंबरमध्ये जिओ सुरू झाल्यापासून एअरटेलने प्रथमच वाढ नोंदवली आहे. ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅचने म्हटले आहे की, एअरटेलने 26 लाख ऍक्टिव्ह युजर्स जोडले आहेत तर जिओने फक्त 400,000 ऍक्टिव्ह युजर्स जोडले आहेत. जिओने मार्चपासून मोफत सेवा बंद केल्यामुळे ऍक्टिव्ह युजर्सच्या संख्येवर परिणाम झाला असल्याचे यात म्हटले आहे. शिवाय बरेच लोक 'बॅकअप सिम' म्हणून जिओचा वापर करतात.

दुसरीकडे, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोनच्या ऍक्टिव्ह युजर्सची एकूण टक्केवारी 98 टक्के इतकी आहे. मात्र त्याचप्रमाणे शुल्क आकारलेल्या जियोच्या ग्राहकांची एकूण संख्या 7.2 कोटींवरून (मार्च) आता 8 कोटींवर (एप्रिल) पोचली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL's unlimited 4G data offer to take on Reliance Jio, Airtel, Vodafone, Idea: Best 4G data tariff plans