Budget 2020:इन्कम टॅक्स संदर्भात मोठी घोषणा; नोकरदारांना दिलासा; श्रीमंतांवरील कर कायम

टीम ई-सकाळ
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

श्रीमंतांवरील वार्षिक उत्पन्नावर लागू करण्यात आलेला 30 टक्के कर कायम ठेवण्यात आलाय. 

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, अर्थसंकल्पात प्राप्तिकर प्रणालीतील बदल जाहीर करून सर्वसामान्य कर दात्यांना दिलासा दिला. वैयक्तिक करामध्ये पाच लाखांवरील उत्पन्नावर असलेल्या करामध्ये कपात जाहीर करण्यात आलीय. यात पाच ते साडे सात, साडे सात ते दहा, दहा ते साडे बारा, अशा सर्व उत्पन्न गटातील करावर कपात करण्यात आलीय. तर 15 लाख रुपयांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गटाला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. श्रीमंतांवरील वार्षिक उत्पन्नावर लागू करण्यात आलेला 30 टक्के कर कायम ठेवण्यात आलाय. 

बजेट संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: 1 person, sitting, text that says "सकाळ BUDGET 2020-21 प्राप्तीकर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा ते साडेसात लाखांपर्यंत 10 टक्के कर भरावा लागणार 7.5 लाख ते 10 उत्पन्न 15 टक्के कर 10 12.5 टक्के लाखांपर्यंतचे उत्पन्नावर 20 टक्के कर 12.5 ते 15 लाखांपर्यंतचे उत्पन्नावर 25 टक्के कर 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के कर नवीन कंपन्यांसाठी टॅक्स टॅक्स 15 टक्के eSakal.com"

पाच लाखांपर्यंतचा 5 टक्के कर कायम
देशात वैयक्तिक उत्पन्न अडीच लाखांपर्यक करमुक्त आहे. अडीच ते पाच लाख उत्पन्न गटाला पाच टक्के कर आहे. आजच्या अर्थसंकल्पात हा पाच टक्के कर कायम ठेवण्यात आलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budget 2020 finance minister nirmala sitharaman income tax announcement