
देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो.
देशाचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आत्तापर्यंत पटकावला आहे. त्यांच्यानंतर इतर अर्थमंत्र्यांचा क्रम लागतो. तर, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर राहिलेले आणि त्यानंतर अर्थमंत्री व मग पंतप्रधान झालेले डॉ. मनमोहनसिंग यांनी खुलेपणाच्या धोरणाचे पर्व देशात सुरू केले. येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्माला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट, सादर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर बजेटच्या इतिहासात डोकावलं तर, अनेक रंजक गोष्टी वाचायला मिळतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अर्थमंत्र्यांची मांदियाळी
- निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी (2019) अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या आधी 28 अर्थसंकल्प डॉ. मनमोहनसिंग (1991-96), यशवंत सिन्हा (1998-2003), जसवंतसिंह (2003-2004), पी. चिदंबरम (1996-98, 2004-09 व 2013-14), प्रणव मुखर्जी (2009-13) आणि अरुण जेटली (2014-19) यांनी सादर केले होते. या वर्षीही सीतारामनच आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करतील.
- सी. डी. देशमुख यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
- भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 26 अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत.
Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची!
इंदिरा गांधी, निर्मला सीतारामन
- 19070-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी निर्मला सीतारामन यांना मिळाली होती.
ब्लॅक बजेट
- 1973-74 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पीय तूट 550 कोटी रूपये दाखवली गेली, त्यामुळे त्याला "ब्लॅक बजेट' असे संबोधले जाते.
Budget 2020: परवडणारी घरे झपाट्याने वाढण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज
वाहू लागले खुलेपणाचे वारे
- मनमोहनसिंह यांनी 1991 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशात खुलेपणाचे वारे सुरू केले.
- 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेले भाषण सर्वात मोठे, म्हणजे 18,650 शब्दांचे होते. त्यावेळेपासून देशात खुलेपणाचे धोरण राबवणे सुरू झाले. देशाची आर्थिक स्थितीही त्यावेळी नाजूक आणि चिंताजनक होती.
मोरारजी देसाईंचा बोलबाला
- देशात सर्वाधिक 10 अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्याने मोराराजी देसाई यांनी सादर केले. देसाई यांनी 1959-63 आणि त्यानंतर 1967-69 या कालावधीत अर्थसंकल्प सादर केले. याशिवाय, त्यांनी 1962-63 आणि 1967-68 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केले.
- मोरारजी देसाई यांनी 29 फेब्रुवारी 1964 रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचीच पुनरावृत्ती 1968 मध्येही त्यांनीच केली; कारण त्या वेळीही लीप वर्ष होते.
करप्रणालींची मुहूर्तमेढ
- अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंह यांनी पहिल्यांदा सेवाकर सुरू केला; तर विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मोदव्हॅट (मॉडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्स), राजीव गांधी यांनी मॅट (मिनिमम अल्टरनेट टॅक्स) सुरू केला.
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)