आधार नसलेल्यांना लाभ नाकारले नाहीत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नवी दिल्ली - सरकारी योजनांचे लाभ आधार क्रमांक नसल्यामुळे नागरिकांना नाकारण्यात आल्याची आकडेवारी आमच्याकडे नाही, अशी माहिती राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी दिली. आधार क्रमांक नसल्याच्या कारणावरून सरकारी योजनांचे लाभ नाकारलेल्या नागरिकांची आकडेवारी आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने केली. यावर राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी आधार क्रमांक नसल्याच्या कारणावरून कोणालाही सरकारी योजनांचा लाभ नाकारण्यात आला नव्हता. यामुळे अशा नागरिकांची आकडेवारी नाही, असे सांगितले.

Web Title: business news aadhar card Govt. Schemes