आणखी एक कर्ज गैरव्यवहार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नवी दिल्ली-  हैदराबादमधील टोटेम इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने आठ बॅंकांची १ हजार ३९४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. 

टोटेम इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांसोबत विविध प्रकल्पांमध्ये उपकंत्राटदार म्हणून काम केले आहे. युनियन बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कंपनीचे प्रवर्तक टोट्टेमपुडी सलालीथ आणि टोट्टेमपुडी कविता यांच्यावर ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने अनेक बॅंकांकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेले कर्ज दुसऱ्या कारणांसाठी वापरले. 

कंपनीचे प्रवर्तक बेपत्ता असल्याचे बॅंकेने ‘सीबीआय’ला सांगितले होते. ‘सीबीआय’ने त्यांच्या नवीन निवासस्थानाचा शोध घेऊन तेथे आज छापे घातले. कंपनीचे प्रवर्तक विदेशात पळून जाऊ नयेत यासाठी ‘सीबीआय’ने त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस बजावली आहे. 

करबुडव्यांच्या यादीत कंपनी 
प्राप्तिकर विभागाने २०१५ मध्ये जाहीर केलेल्या करबुडव्यांच्या यादीत कंपनीचा समावेश होता. त्या वेळी कंपनीचा चारशे कोटी रुपयांचा कर थकीत होता. या कंपनीचा पत्ता सापडत नसल्याने कंपनीबद्दल माहिती देणाऱ्याला १५ लाख रुपयांचे बक्षीसही त्या वेळी प्राप्तिकर विभागाने जाहीर केले होते.

एकूण  बँका 8
गैरव्यवहार  1,394 कोटी रुपये

Web Title: business news Another debt waiver CBI