बॅंक ऑफ इंडियाविरोधात कारवाई

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने आता बॅंक ऑफ इंडियाविरोधात बुडीत कर्जांप्रकरणी कारवाई (प्रॉम्ट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन) करण्यास सुरवात केली आहे. बॅंकेच्या बुडीत कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे आता बॅंकेच्या नव्याने कर्ज वितरण करण्यावर तसेच लाभांश वितरणावर निर्बंध येतील. 

बॅंकांची ढोबळ बुडीत कर्जे १० टक्‍क्‍यांवर गेल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून कारवाई केली जाते; मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या या कारवाईचा बॅंकेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. याउलट, या सर्व उपाययोजनांमुळे बॅंकेची एकूण कामगिरी सुधारण्यास मदत होईल. रिझर्व्ह बॅंकेकडून याआधी महाराष्ट्र बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, देना बॅंक, आयडीबीआय बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि युको बॅंकेवर बुडीत कर्जांप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

बॅंक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये आज इंट्राडे व्यवहारात  १७१.७० रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे. शेअर अखेर ३.९४ टक्‍क्‍यांच्या म्हणजेच ७.१५ रुपयांच्या घसरणीसह १७४.२० रुपयांवर व्यवहार करत बंद झाला.

Web Title: business news bank of india reserve bank