‘कनिष्क गोल्ड’च्या भूपेश जैनला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

चेन्नई - स्टेट बॅंक ऑफ इंडियासह (एसबीआय) १४ बॅंकांची ८२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवर्तक व संचालक भूपेश कुमार जैन याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी अटक केली. 

भूपेश जैन याची पत्नी नीता हिची चौकशीही सीबीआयकडून सुरू आहे. सीबीआयने कनिष्क गोल्ड, भूपेश, नीता, कंपनीचा भागीदार तेजराज अच्चा, अजय कुमार जैन आणि सुमीत केडिया आणि अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

एसबीआयसह १४ बॅंकांची ८२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कनिष्क गोल्ड ही चेन्नईस्थित कंपनी असून, विक्रेत्यांना दागिन्यांचा पुरवठा करण्याचे काम ती  करीत होती. कंपनीने बॅंकांकडून कर्ज काढून त्यांची फसवणूक केली आहे.

सीबीआयची  ‘लूक आउट’ नोटीस 
कनिष्क गोल्ड कंपनीचे प्रवर्तक आणि संचालकांनी देश सोडून पलायन करू नये यासाठी त्यांच्याविरुद्ध ‘लूक आउट’ नोटीस ‘सीबीआय’ने बजावली आहे. याचबरोबर कंपनीचे कार्यालय आणि प्रवर्तकांच्या निवासस्थानांवरही छापे घातले आहेत.

Web Title: business news Bhupesh Jain of Kanishka Gold arrested CBI