बीएसएनएलने आणले ‘जिओ प्लॅन’

पीटीआय
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएलने ग्राहकांना जबरदस्त ऑफर देऊ केली आहे. बीएसएनएलने तीन प्लॅन सादर केले असून त्याअंतर्गत 90 दिवस दररोज 5 जीबी डेटा मिळणार आहे. कंपनीने 258 रुपये, 378 रुपये आणि 548 रुपयांच्या तीन ऑफर देऊ केल्या आहेत. मात्र यातील दोन प्लॅन हे फक्त पंजाब आणि गुजरात सर्कलसाठी देण्यात आले आहेत. सर्कलनुसार प्लॅनची किंमत वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. बीएसएनएलचे हे प्लॅन जिओप्रमाणे असल्याने थोडक्यात जिओप्रमाणे भरपूर डेटा देत बीएसएनएलने 'जिओ प्लॅन' देऊ केले आहेत.

नव्या प्लॅन नुसार 90 दिवसांत दररोज 5 जीबी डेटा मिळणार आहे.

258 रुपयांचा प्लॅन:
ग्राहकाला 220 रुपयांचा टॉकटाइम, 110 प्री ऑन-नेट वॉईस कॉलिंग ( बीएसएनएल ते बीएसएनएल). ही ऑफर ३० दिवस वैध असणार आहे.

378 रुपयांचा प्लॅन:
दररोज 4 जीबी डेटा, एक दिवसात 4 जीबी टेडा संपला की 80 केबीपीएस स्पीड मिळेल. अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि ऑफ नेटसाठी 30 मिनिटे प्रतिदिन मिळणार, याला देखील 30 दिवसांची वैधता देण्यात आली आहे.

548 रुपयांचा प्लॅन:

यामध्ये 3 महिन्यांसाठी रोज 5 जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर 80 केबीपीएस स्पीड मिळेल. मात्र यात व्हाईस कॉलिंग सुविधा नसेल.

Web Title: business news BSNL