विकासदर ७.३ टक्केच

Moodys
Moodys

नवी दिल्ली - भारताच्या विकासदरवाढीच्या अंदाजात घट केल्याची माहिती ‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने दिली. या आधी भारताचा विकासदर ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, यामध्ये कपात करताना भारताचा विकासदर ७.३ टक्के राहील, असा सुधारित अंदाज ‘मूडीज’ने वर्तवला आहे. 

जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे ‘मूडीज’ने म्हटले आहे. दरम्यान, २०१९ मध्ये मात्र जीडीपी पुन्हा ७.५ टक्‍क्‍यांवर राहणार असल्याचे ‘मूडीज’चे म्हणणे आहे. येत्या काही महिन्यांमध्ये वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘जीएसटी’संदर्भात एका वर्षभरात परिस्थिती समाधानकारक होईल, असेही मूडीजने म्हटले आहे. 

दरम्यान, चलनतुटवड्याचा सामना अजूनही करावा लागत असल्याचे चित्र असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे चित्र आहे. 

इंधनदरवाढीचा फटका
समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग उत्तम राहणार असल्याचे सांगता इंधनदरवाढीमुळे अर्थव्यवस्था वाढीचा वेग  ७.३ टक्के राहील, असे मूडीजने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com