नोटाबंदीनंतर वाढला डिजिटल पेमेंटचा वापर

नोटाबंदीनंतर वाढला डिजिटल पेमेंटचा वापर

मुंबई - नोटाबंदीनंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांकडून देयकांसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात निम्म्याहून अधिक भारतीयांनी देयकांसाठी डिजिटल पर्यायांचा वापर केल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. 

डिजिटल पेमेंट्‌समधील अग्रगण्य व्हिसाने यूजीओव्ही या कंपनीच्या सहकार्याने भारतात सर्वेक्षण केले. ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंट्‌सबद्दल जागरूकता वाढली आहे. ग्राहक डिजिटल पद्धतीचा स्वीकार करीत असल्याचे दिसून आले आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या संक्रमणाविषयी ग्राहकांची मते आणि कल समजून घेण्यात आली. सुमारे ७८ टक्के ग्राहक दैनंदिन जीवनात डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सचा अवलंब करत आहेत. डिजिटल पद्धतींमुळे आर्थिक व्यवहार करणे सुलभ होत असल्यामुळे या पद्धतीकडे वळल्याचे ८६ टक्के वापरकर्त्यांनी सांगितले. ऑनलाइन व्यवहार करताना सुलभतेपेक्षा सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत असल्याचे ८१ टक्के ग्राहकांनी म्हटले आहे. डिजिटल पेमेंट्‌ससाठी कार्डचा वापरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. देशातील जवळपास ३६ टक्‍के ग्राहक कार्डचा वापर करत असल्याचे सर्वेतून दिसून आले आहे. वर्षभरात हे  प्रमाण ३ टक्‍क्‍यांनी वाढून ३९ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

आयओटी, कॉन्टॅक्‍टलेस पेमेंट टेक्‍नोलॉजी, सरलीकृत, सुरक्षित आणि वेगवान ई-कॉमर्सचा अनुभव इत्यादी वैशिष्ट्ये भविष्यातील पेमेंटची नवी परिभाषिते असतील, असे भारत आणि दक्षिण आशिया व्हिसाचे ग्रुप कंट्री मॅनेजर टीआर रामचंद्रन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com