‘डीएसके’सह २४ कंपन्यांना दंड

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीतील आर्थिक निकाल सादर करण्यास अपयशी ठरलेल्या २४ कंपन्यांना राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) दंड ठोठावला आहे. यामध्ये गीतांजली जेम्स आणि डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स या कंपन्यांचा समावेश आहे. 

‘एनएसई’ने २४ कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना या निर्णयाची माहिती पत्राद्वारे कळविली आहे. कंपन्यांनी तिमाही आर्थिक निकाल ‘एनएसई’समोर सादर करणे बंधनकारक आहे. गुंतवणूकदारांना कळविण्यात आले आहे, की तुम्ही गुंतवणूक केलेल्या कंपन्यांनी तिमाही आर्थिक निकाल सादर केलेले नाहीत. कंपन्यांवर सुरवातीला दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ठराविक मुदतीत आर्थिक निकाल सादर न केल्यास त्यांच्या व्यवहारांवर शेअर बाजारात बंदी घालण्यात येईल. 

या कंपन्यांनी तिमाही संपल्यापासून ४५ दिवसांत निकाल सादर करणे बंधनकारक आहे. या कंपन्यांवर सध्या दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांनी निकाल सादर न केल्यास त्यांच्या व्यवहारांवर बंदीची कारवाई होऊ शकते. कंपनी आर्थिक  निकाल सादर करेपर्यंत सुरवातीला दररोज पाच हजार रुपये दंड आकारण्यात येतो. कंपनीकडून १५ दिवसांपेक्षा अधिक काळ उल्लंघन कायम राहिल्यास अतिरिक्त दंड आकारला जातो. 

कारवाई  झालेल्या कंपन्या   
गीतांजली जेम्स, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स, एबीजी शिपयार्ड, ॲमटेक ऑटो, भारत डिफेन्स अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर, एज्युकॉम्प सोल्यूशन्स, श्री रेणुका शुगर्स, मोजर बेअर आणि स्टर्लिंग बायोटेकसह २४ कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title: business news DSK NSE