आरोपींच्या चौकशीस ‘ईडी’ला परवानगी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) अटक केलेल्या नीरव मोदीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) चौकशीस ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने परवानगी दिली.  ‘ईडी’ने याचिकेद्वारे चौकशीची मागणी केली होती. न्यायालयाने ‘ईडी’ची याचिका मंजूर केली. 

आरोपी सध्या मुंबईतील आर्थर रोडवरील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.   फायरस्टार डायमंडचे वित्तीय अध्यक्ष विपुल अंबानी, सहायक व्यवस्थापक मनीस बोनासीया, वित्तीय व्यवस्थापक मितेन पंडित, लेखापाल संजय रांभिया, बॅंकिंग व्यवहार विभागाचे उपाध्यक्ष विपुल चटालिया आणि कार्यकारी सहायक कविता मानकीकर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार आहे.

पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी नीरव मोदी आणि कंपनीवर व हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सीवर सीबीआय व ईडीने स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: business news ED PNB CBI