एनएसईएलप्रकरणी ईडीचे पुन्हा छापे 

पीटीआय
गुरुवार, 31 मे 2018

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रीय स्पॉट एक्‍स्चेंज (एनएसईएल) मनी लाँडरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने पाच राज्यांमध्ये छापे घालत कारवाई केली. दिल्ली, चंडीगड, अहमदाबाद (गुजरात), मुंबई (महाराष्ट्र) व बंगळुरू (कर्नाटक) येथे ईडीने छापे घातले. सबळ पुरावे मिळविण्यासाठी नव्याने छापे घालण्यात आले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

एनएसईएल प्रकरणात ईडीने यापूर्वी केलेल्या कारवाईत दोन हजार ८०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह ईडीने ही कारवाई केली होती. मार्च २०१५ मध्ये यासंदर्भात एनएसईएलसह अन्य वीस जणांविरोधात वीस हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. 

Web Title: business news EDI raid