निर्यातदार हवालदिल

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

‘जीएसटी’चा 20 हजार कोटींचा परतावा थकित
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सुमारे २० हजार कोटी रुपयांचा परतावा रखडल्याने देशभरातील निर्यातदार हवालदिल झाले आहेत. यातील निम्म्याहून अधिक रक्कम ‘इनपूट टॅक्‍स क्रेडिट’मध्ये अडकल्याचा दावा फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍सपोर्ट ऑर्गनायझेशनने (फिओ) केला आहे.

‘जीएसटी’चा 20 हजार कोटींचा परतावा थकित
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सुमारे २० हजार कोटी रुपयांचा परतावा रखडल्याने देशभरातील निर्यातदार हवालदिल झाले आहेत. यातील निम्म्याहून अधिक रक्कम ‘इनपूट टॅक्‍स क्रेडिट’मध्ये अडकल्याचा दावा फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍सपोर्ट ऑर्गनायझेशनने (फिओ) केला आहे.

‘आयजीएसटी’अंतर्गत मिळणारी कर वजावट योग्य वेळी मिळणे आवश्‍यक आहे; मात्र तसे होत नसल्याने सध्या अनियमितता वाढली आहे, असे फिओचे अध्यक्ष गणेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, की ‘आयजीएसटी’तील परतावा कायमस्वरूपी मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. मार्चमध्ये सात हजार कोटींचा परतावा देण्यात आला आहे.

एप्रिलमध्ये एक हजार कोटींचा परतावा देण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे इनपुट टॅक्‍स क्रेडिट मिळण्यात अनेक निर्यातदारांना अडचणी येत आहेत. इनपुट टॅक्‍स क्रेडिट मिळण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन करावी लागते, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. निर्यातदारांसाठी ही प्रक्रिया खर्चिक बनली आहे. ऑफलाइन अर्ज करणाऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये ‘जीएसटी’ विभागाकडून त्रुटी काढल्या जात असल्याने प्रक्रिया रखडली आहे. 

विमान कंपन्या आणि मालवाहतूकदार कंपन्यांकडून माल वाहतुकीचे ‘इनव्हॉइस’ सीमा शुल्क विभागाला सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ‘जीएसटी’ परताव्याची प्रक्रिया रखडली आहे. बॅंकांकडूनही निर्यातदारांची अडवणूक केली जात आहे. बॅंकांकडून अर्थसाह्य देताना कठोर नियमावली केल्याने निर्यातदार अडचणीत आले आहेत, असा आरोपही गुप्ता यांनी केला.

यंदा निर्यात 350 अब्ज डॉलरवर
निर्यातदार ‘जीएसटी’ यंत्रणेशी झगडत आहेत. चालू आर्थिक वर्षात ३५० अब्ज डॉलरची निर्यात होईल, असा विश्‍वास ‘फिओ’ने व्यक्‍त केला. चालू वर्षात निर्यातीत १५ ते २० टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. रुपयातील अवमूल्यनामुळे निर्यातीतून चांगली कमाई होणार आहे. ऑटोमोबाईल, फार्मा, प्लॅस्टिक वस्तूंच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: business news exporter GST arrears