‘फेडरल रिझर्व्ह’चा सेन्सेक्‍सला धक्का

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नवी दिल्ली - अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात वाढ केल्याचा फटका शेअर बाजाराला गुरुवारी बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १२९ अंशांची घसरण होऊन ३३ हजार ६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांच्या घसरणीसह १० हजार ११४ अंशावर बंद झाला. 

सकाळी सेन्सेक्‍सची सुरवात चांगली झाली. तो ३३ हजार २८१ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. मात्र, त्यानंतर नफेखोरी सुरू झाल्याने निर्देशांकात घसरण झाली. अखेर कालच्या तुलनेत त्यात १२९ अंशांची घसरण होऊन तो ३३ हजार ६ अंशांवर बंद झाला. मागील दोन सत्रांत सेन्सेक्‍समध्ये २१३ अंशांची वाढ झाली होती. देशांतर्गत तसेच, परकी गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढल्याने सेन्सेक्‍समध्ये मागील दोन सत्रांत वाढ झाली होती. बांधकाम, कॅपिटल गुड्‌स, तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, सरकारी कंपन्या, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि बॅंकिंग क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग १.२८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. 

घसरणीची कारणे 
 ‘फेडरल रिझर्व्ह’कडून वर्षातील पहिलीच व्याजदरवाढ 
 युरोपीय बाजारातील घसरणीचे सत्र 
 आशियाई बाजारातील संमिश्र स्थिती 
  गुंतवणूकदारांकडून नफेखोरीचे वातावरण

Web Title: business news Federal Reserve sensex